Anagha Walimbe, BFRP

Emotional Unavailability 

भावनिक अनुपलब्धता

Couples consultation साठी येणाऱ्या काही जोडप्यांमधे कॉमन अडचण आढळून आली. आर्थिक सुखं असून काय उपयोग? माझ्या भावनाच समजून घेत नाही. ह्यात नवीन लग्न झालेल्या couple पासून ते लग्नाला बरीच वर्षे झालेली मुरलेली जोडपी अशी सगळ्या वयोगटातील मंडळी होती. 

नवरा किंवा बायको ह्यातील एकाची तक्रार होती की लाईफ पार्टनर माझ्यासाठी कधीच भावनिक दृष्ट्या उपलब्ध नसतो.. भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसल्याचे दु:ख कुणाला सांगितले, तर ऐकणारे म्हणतात सगळं छान सुरू आहे की तुमचं. जगात किती अडचणी असतात, कुणाला नोकरी व्यवसायाची अडचण तर कुणाला स्वत:चे घर नसते. So Be positive... Think Positive.

पण ही सल किंवा बोच हल्ली फार जास्त जाणवते. आमच्या नात्याबद्दल खोलात जाऊन विचार केला तर काही वेळा भिती वाटते; हा संसार, ही मुलं, हे नाती जपणं.. हे सगळं एकतर्फी सुरू होतं का?  माझी निवड चुकली का?  

 साध्या साध्या अपेक्षा असतात, त्यादेखील पूर्ण होत नसल्या तर ..

काय उपयोग आहे ह्या नात्याचा?

प्रत्येक Consultation नंतर एक सेल्फ assessment प्रॅक्टिस करत असल्यामुळे क्लाईंट च्या प्रमुख समस्या आणि कॅटेगरी ह्यात भर पडत गेली. Couples consultation साठी येणाऱ्या जोडप्यामधे कॉमन अडचण आढळून आली. आर्थिक सुखं असून काय उपयोग? माझ्या भावनाच समजून घेत नाही. ह्यात नवीन लग्न झालेले romantic couple पासून ते लग्नाला बरीच वर्षे झालेली मुरलेली जोडपी अशी सगळ्या वयोगटातील मंडळी होती. नवरा किंवा बायको ह्यातील एकाची  तक्रार असते की लाईफ पार्टनर माझ्यासाठी कधीच भावनिक दृष्ट्या उपलब्ध नसतो.. भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसल्याचे दु:ख कुणाला सांगितले, तर ऐकणारे म्हणतात जगात किती अडचणी असतात, कुणाला नोकरी व्यवसायाची अडचण तर कुणाला स्वत:चे घर नसते. So Be positive. पण ही सल किंवा बोच हल्ली फार जास्त जाणवते. आमच्या नात्याबद्दल खोलात जाऊन विचार केला तर काही वेळा भिती वाटते; हा संसार, ही मुलं, हे नाती जपणं.. हे सगळं एकतर्फी सुरू होतं का?  माझी निवड चुकली का?  इति Couple consultation साठी आलेले क्लाईंट.कुरबुर आहे म्हणून समजले की नातेवाईक मंडळी सांगू लागतात की लग्नाला थोडेच दिवस झालेत, तुम्ही suitable आहात आता थोडीफार अडजस्टमेंट सगळ्याच नात्यात करावी लागते.  समाजात देखील आताच्या पिढीला अजिबात अडजस्ट करायचे नसते ही ओरड दिसून येते. मग काही वेळेस नवीन पिढी म्हणत असते, "तुमच्या काळात इलाज नव्हता किंवा लोकं काय म्हणतील ह्या भीतीने तुम्ही संसार टिकवला". ह्यावर जेष्ठ मंडळी म्हणतात काय बोलायचे तुमच्या पिढी समोर?  हात जोडतो पण आमच्या गोष्टीवर येऊ नका कारण आमच्या काळात आम्ही काय सोसले हे तुम्हाला समजणार नाही. पन्नाशी पार केलेले clients म्हणतात, आता ह्या वयात divorce सारखा decision घेण्याचे बळ नाही आणि इच्छा देखील नाही, पण खूप वर्ष सहन केले आहे, आता वय झाले असावे म्हणून सहनशक्ती देखील संपायला आली आहे. साध्या साध्या अपेक्षा असतात, त्यादेखील पूर्ण होत नसल्या तर ..काय उपयोग आहे ह्या नात्याचा ?असे वाद संवाद घरो घरी होत असतात. पण consultation साठी आलेल्या जोडप्यापैकी  70% जोडप्या मधे एकजण भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसल्यामुळे ह्या सर्व अडचणी जाणवत होत्या हे दिसून आले. भावनिक अनुपलब्धता म्हणजे काय असते? जेव्हा एक किंवा दोन्ही पार्टनर नातेसंबंधात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतण्यासाठी संघर्ष करतात, तेव्हा नात्यातली कुरबुर वाढते आणि रोजच्या आयुष्यात विसंवाद वाढत जातात. तर अशा भावनिक दृष्ट्या अनुपलब्ध असलेल्या लोकांमध्ये कॉमन गोष्टी आढळून आल्या:

  • कोरडे, थंड किंवा अलिप्त वर्तन 
  • Initiative तसेच Intimacy चा अभाव 
  • भावना व्यक्त न करता येणे  
  • भावनांबद्दल बोलण्यात अडचण येणे
  • नातेसंबंधात आपुलकी अथवा जवळीक नसणे 
  • खास नाते निर्माण करण्यात असमर्थता
  • जगण्यात नेहमीच एक प्रकारची उदासीनता
  • दुसऱ्याला वाईट वाटत आहे हे दिसत असताना देखील साफ दुर्लक्ष करणे
  • असले काय नसले काय दोन्ही ह्यांच्या दृष्टीने सारखेच असते
  • रूटीन आवडते पण नावीन्य असायलाच हवे असे काही नाही 

नवरा बायको ह्या नात्यात जेव्हा काही बिनसते, तेव्हा आरोप प्रत्यारोप देखील होतात. उत्साही असलेले spouse सांगतात की ट्रीप, बाहेर फिरायला किंवा जेवायला जाणे असो; आम्ही आयुष्यात जी काही मजा केली त्यात ह्यांच्या बाजूने कधीच पुढाकार नसतो. मी तक्रार केली की त्यावर अवाक्षर देखील काढत नाहीत; मग  एकदम  बचावात्मक पवित्रा घेतात किंवा मला कसलीच तक्रार नाही पण प्रॉब्लेम नेहमी तुलाच असतो असा आरोप करतात. भावनिक मोकळेपणा आवश्यक असलेले विषय नेहमी टाळतात. त्यांना uncomfortable असलेल्या परिस्थितीत नेहमी अंग काढून घेतात. काही मंडळी दुटप्पी वागतात असा आरोप देखील त्यांच्या स्पाऊज ने केला म्हणजे त्यांची माणसं (आईवडील किंवा भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणी ) असताना  मोकळे असतात पण माझी माणसं, म्हणजे माझे मित्र मंडळी किंवा माझ्यासाठी खास माणसं म्हणजे ह्यांचे सासू-सासरे, मेहुणा-दीर, मेहुणी नणंद जाऊ ह्या नात्यात मात्र अबोला किंवा कोरडे पणा असतो. तसेच त्यांच्या प्रिय लोकांसमोर फटकन बोलून माझा अपमान केला असल्याची देखील तक्रार होती. 

भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध वागण्यामागे बरेच वेळा व्यक्तीचे लहान पणीचे अनुभव, लग्न झाल्यावर बदललेले वातावरण तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक घटक देखील कारणीभूत असल्याचे जाणवले. काही घरात भावना व्यक्त करणे हे दुर्बलतेचे लक्षण समजले असून त्याऐवजी भावनांना दाबून टाकणे योग्य असते असे शिकवले जाते. आपण देखील बरेच वेळा ह्यातले काही बोलत असतो Be practical .. don’t behave like emotional fool, भरल्या घरात रडू नये किंवा जेव्हा पाहावं तेव्हा तोंड पाडून बसण चांगलं वाटत का?
 
भावनिक दृष्ट्या उपलब्ध नसलेल्या लोकांपैकी काहींचा मूळ स्वभाव शांत, अबोल, भिडस्त होता तर काही जण  एकदा सूर जुळले की छान गप्पा मारणारे.  काहींना असे देखील अनुभव आलेले होते की जेव्हा जेव्हा आपण व्यक्त झालो, तेव्हा तेव्हा वाट्याला जास्त करून वेदना आणि दुःख आली; किंवा माझ्या बोलण्याची खिल्ली उडवली गेली. काहीना असे वाटत होते की, आपण व्यक्त होऊन उपयोग होणार नाही किंवा माझ्या दुखावले जाण्याला कोणी किंमत देणार नसेल तर मी व्यक्त तरी कशाला व्हायचे?

मोकळे पणाने बोलणारे ह्यांचे स्पाऊज किंवा ह्यांच्या अशा वागण्याची तक्रार करणारे काहीवेळेस अलिप्तपणा आणि अबोला असह्य होऊन तू भांड तरी माझ्याशी, चल एक घाव दोन तुकडे करू असे बोलून देखील उपयोग नसल्याने जास्त व्यथित होतात. भावनिक कोंडी कशी फोडावी असा प्रश्न नेहमी मलाच पडतो, अबोला-राग - चिडचिड काही बोललो तरी त्यावेळेस तिथे नसल्यासारखे वागतात. ठराविक एकच उत्तर असते की मला काहीच प्रॉब्लेम नाही.  तुलाच सर्व समस्या असल्यासारखे दाखवून दिले जाते. कधीतरी माझ्याकडून कसली तरी अपेक्षा ठेवावी कारण अपेक्षा देखील आपल्याच माणसाकडे व्यक्त करतो. अशा वेळेस एवढा परकेपणा जाणवतो, आणि वाटते की हे नाते केवळ नावापुरते शिल्लक आहे. 

जेव्हा नात्यातील भिंत तुटत नसते तेव्हा भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध लोकांचे spouse ही गोष्ट खूप personally घेत असतात. पार्टनर विश्वास ठेवत नाही किंवा त्यांचे प्रेमच नाही अथवा त्यांना आपण पसंत नाही असे देखील गृहीत धरू शकतात. ह्या विचारामुळे नाते जणू संपुष्टात आले असल्यासारखे वाटत राहते.

भिडस्त स्वभाव, व्यक्त न होता येणे आणि कोरडे पणा साठी वेगवेगळ्या Bach Flower Remedies येतात. स्वभावात आणि वागण्यातून देखील पुष्प औषधीच्या छटा दिसून येतात. भिडस्त पणा साठी देखील बऱ्याच पुष्प औषधी येतात आणि हे प्रकार जेव्हा client ना सांगते तेव्हा ते सहजपणे हो हा माझा प्रकार असल्याचे कबूल करतात. तसेच तक्रार करणाऱ्या स्पाऊजची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या निराशे सोबत चिडचिड, धुसफूस तर कधी एकटे पणाची भावना कमी होऊन दोघांच्या नात्यात समजूतदार पणा वाढीस लागतो. एकटेपण असो किंवा निराशा, त्याचे प्रकार पाहून उपाय सुचवले जातात. योग्य Bach combination मिळाले की फायदा नक्कीच होतो. पर्सनल मिक्स मधील Bach Flower Remedies नियमित घेणे मात्र आवश्यक असते. पर्सनल मिक्स संपल्यावर होमिओपॅथी दुकानातून कोणी same मिक्स घेतात तर काही follow up साठी विचारतात. 


खरे तर नवरा आणि बायको दोघांना देखील आपसतील गैरसमज कमी झाले तर जीने मे आये मजा हा अनुभव हवाच असतो. पण एकजण अगदी उघड पणे हे सांगत असतो तर एक जण व्यक्त होऊ शकत नसतो. नात्यातील तणाव कमी झाल्याचे, अपेक्षा भंग होत असल्याचे दु:ख कमी होत असल्याचे आणि समजूतदार पण वाढीस लागल्याचे बहुतेक जण कळवतात. असे होते तेव्हा, अजून एक घरटे मोडण्यापासून वाचल्याचा आनंद वाटतो. 

Anagha Walimbe, BFRP