मेनोपॉज मधे पुष्पऔषधी एक वरदान

Anagha Walimbe, BFRP

Bach Foundation Registered Practitioner

🤷🏻‍♀️मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचे सरासरी वय पन्नास-बावन्न, पंचावन्न समजले तरी, तिशी आणि चाळिशीच्या आसपास हे बदल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्री-मेनोपॉज हा संक्रमणाचा टप्पा (transition phase) आहे.  ही फेज पाच ते दहा वर्षे टिकू शकते.  ह्या दरम्यान जाणवणाऱ्या भावनिक आव्हानांमुळे स्त्रीच्या सोबत जेव्हा कुटुंबाची देखील फरफट  होत असते.. तेव्हा पुष्पऔषधी वरदान असल्याप्रमाणे मदतीला येतात.  स्त्री रोगतज्ञ देखील Bach Flower Remedies recommend करत आहेत हे विशेष. 

मेनोपॉज मुळे होणाऱ्या भावनिक त्रासावर Bach Flower Remedies मदत करतात. आधी कोणकोणत्या समस्या असतात हे पाहू. 

🤦🏻‍♀️मूड स्विंग्स: संप्रेरकातील  चढउतार (hormonal changes) यामुळे मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, दुःख आणि चिंता या भावना अधिक प्रमाणात जाणवू शकतात. कसली तरी अनामिक हुरहूर आणि अस्वस्थता वारंवार जाणवत असते आणि नेमकेपणाने व्यक्त होता येत नसल्यामुळे, आपल्याला कोणी समजून घेत नाही अशी तक्रार मग बऱ्याच स्त्रिया सांगतात. काही घरात सगळे समजून घेत असतात ..तरीदेखील ही एक अवघड समस्या होऊन बसते.  यावर पुष्प औषधीचा उपाय असतो. 
😓 सततचा थकवा:  साधी भाजी घेऊन आले तरी हाश हुश होते. चार माणसे जेवायला येणार ह्याचे टेन्शन. स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत, केर फरशी आणि कपडे भांड्याला मदतनीस आहे, तरी देखील मला माझ्यासाठी वेळ काढता येत नाही. रोज छोट्यामोठ्या समस्या आल्या की माझा व्यायाम राहतो.. त्यामुळे ना stamina च नाही राहिला कशाचा. काही नोकरी करणाऱ्या झेपत नाही, सोडावी का नोकरी अशा द्विधा मनस्थिती मधे असतात. कंटाळा, आळस ते शारीरिक किंवा मानसिक थकवा ह्यावर पुष्प औषधी असतात.
😕 नैराश्य: रजोनिवृत्तीमुळे काही स्त्रियांना नैराश्याचा धोका वाढू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ वाटणे, अडचणी आल्यावर तणाव किंवा स्ट्रेस, दु:ख, निराशा, तसेच रुटीनचा कंटाळा, फारसे गंभीर कारण नसताना काही करावेसे न वाटणे, आधी आवडत असलेल्या गोष्टींचा देखील उबग येणे, आणि वर्तमान गोष्टीतील स्वारस्य कमी होण्याच्या भावना जाणवू शकतात.
🤔अती चिंता: अस्वस्थतेच्या भावनांमुळे काहीवेळा विशिष्ट कारणाशिवाय चिंता तसेच तणावाची पातळी वाढू शकते.  साध्या प्रसंगात देखील अती चिंता करणे, धडधड होणे, घाम फुटणे आणि भिती वाटणे.. कुणाचे काही वाईट ऐकले की आपल्या बाबतीत तर हे होणार नाही ना अशी चिंता सतावणे. गंभीर आजाराची शक्यता वाटून स्वत:ला किंवा जोडीदाराला काही झाले तर काय? अशा शंका कुशंकांमुळे, विविध आजारांची  भिती,  भविष्याची चिंता  तसेच एकटेपणाची भिती वाटून अस्वस्थता जाणवते.
😫 झोप न येण्याचा त्रास: रजोनिवृत्ती दरम्यान झोपेत व्यत्यय येणे सामान्य आहे, ज्यामुळे थकवा आणि चिडचिड होऊ शकते. ही चिडचिड टाळण्यासाठी टीव्ही, मोबाइल किंवा OTT प्लॅटफॉर्म वरील वेबसिरीज रात्री उशिरा पर्यन्त पाहणे, सकाळी कामाचा घोटाळा झाल्यामुळे अपराधी वाटणे. पण मनावर ताबा नसणे. मनोरंजनात गुंतले नाही तर अती विचाराने देखील झोप खराब होते, ज्यामुळे भावनिक अस्वस्थतेची लक्षणे वाढताना दिसतात. थकवा आणि अतीविचार ह्याचे कारण पाहून त्याप्रमाणे पुष्पऔषधी देता येते. 
😔 Low सेल्फ एस्टीम किंवा आत्म-सन्मान कमी होणे: काही स्त्रिया रजोनिवृत्तीच्या काळात अपुरेपणाच्या भावनेने किंवा कमी झालेल्या आत्म-सन्मानाच्या भावनांशी संघर्ष करताना दिसतात. शारीरिक बदल आणि वजनात होणारी वाढ.. त्या जोडीला व्यायामाचा अभाव ह्यामुळे आरशासमोर उभे राहिल्यावर स्व प्रतिमेतील बदल पाहून आत्मविश्वास कमी होतो. आता जोडीदार आपल्यावर तेवढे प्रेम करत नाही असे वाटून मनात असुरक्षितता निर्माण होते.  उत्साहाने व्यायामाला सुरुवात होते पण त्यात सातत्य नसते आणि त्यामुळे वाटणारे अपराधीपण, useless feeling, आपण काहीच करत नसल्याची भावना व कमी होणारा आत्मविश्वास ह्यावर औषध आहे. 
🧐 जीवनातील बदलांना सामोरे जाताना अडचण:* रजोनिवृत्ती अनेकदा जीवनातील इतर *महत्त्वाच्या बदलांच्या जोडीने येते*... जसे की मुलांचे शिक्षण, नोकरी अथवा लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणे, करिअरमधील महत्वाचा टप्पा आणि वृद्ध पालकांची काळजी घेणे. ही संक्रमणे भावनिक आव्हाने वाढवू शकतात. त्यात जोडीदाराची मनासारखी साथ लाभत नसेल तर, सगळ्या *जबाबदाऱ्यांचे ओझे वाटू लागते.* काहीना भिडस्त स्वभावाने नकार द्यायला जमत नसतो आणि सगळे तिला गृहीत धरतात तेव्हा अगदी छोट्या गोष्टीमुळे भावनांचा विस्फोट होतो. टोकाचा राग, धुसफूस किंवा लगेच रडू येणे, कुणाला आपली किंमत नाही असे वाटणे आणि गैरसमज होऊन नाते संबंधात देखील तेढ निर्माण होते. अशा भावनांना देखील औषध असते.
🤫 लैंगिक चिंता: संप्रेरक पातळीतील बदल हे कामवासना आणि लैंगिक समाधानावर परिणाम करू शकतात. Sexual Anhedonia म्हणजे शारीरिक जवळीक नकोशी वाटणे, घृणा, निरुत्साह, कोरडे पणा  किंवा थंडपणा.  ह्या गोष्टींमुळे भावनिक त्रास होऊन नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात💔 अशा अडचणींवर देखील पुष्प औषधीच्या मदतीने मात करता येते.

सर्व प्रकारच्या भावनिक आव्हानांवर उपाय म्हणजे उत्तम मनोबल. पण ते कमी पडत असल्याचे जाणवत असल्यास, स्वभावाचे औषध म्हणजेच Bach Flower Remedy हा नैसर्गिक उपाय तुम्हाला माहित आहे का?🤨🤔

पुष्प औषधीमुळे भावना आणि विचारात बदल होऊन वागण्यात देखील सकारात्मक बदल होतात. आयुष्यातील छोट्या मोठ्या अडचणीत Bach Flower Remedies घेतल्यामुळे अनेक प्रकारे अडचणींवर मात करता येते. भावनिक अस्वस्थता दूर होऊन मन:शांतीचा अनुभव येतो. ध्येय गाठण्याच्या प्रवासात मनोबल, आत्मविश्वास, धैर्य आणि सातत्य प्रदान करणाऱ्या पुष्पऔषधी ह्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडतात. तुमच्या साठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्ती साठी Bach Flower Remedy ही पर्यायी उपचार पद्धती मनाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.🥰